Online Payment: चुकीच्या खात्यात पैसे पाठवले, हे काम लवकर करा, तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील


Online Payment : ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना, चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळू शकतात. तुम्ही टोल फ्री नंबर डायल करा. पेमेंट दरम्यान प्राप्त झालेला बँकेचा मेसेज  कधीही डिलीट करू नका. तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील

Online Payment : गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले आहे.नोटाबंदीनंतर आर्थिक व्यवहारासाठी डिजिटल पेमेंट सर्वांच्या हातामध्ये आले आहे. आपण दैनंदिन जीवनात UPI च्या माध्यमातून  सर्वजणच मोठ्या प्रमाणावर व्यवहार करत आहे. काही वेळा हे पेमेंट करताना चूक देखील होते.  व दुसऱ्याच्या खात्यात पैसे हस्तांतरित होतात.  असे तुमच्या सोबत भविष्यात घडल्यास  घाबरण्याची गरज नाही. 

चुकीचे ऑनलाइन पेमेंट झाल्यास, तुम्हाला 3 दिवसांच्या आत तक्रार करावी लागेल. यासाठी घरी बसून एका नंबरवर कॉल करावा लागेल. आरबीआयच्या (RBI )मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही चुकून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले तर तुम्हाला ४८ तासांच्या आत परतावा मिळू शकतो. 

तक्रार कशी आणि कुठे करावी

🖕 Click Here

जेव्हाही UPI आणि नेट बँकिंगद्वारे चुकीच्या खाते क्रमांकावर पैसे भरले जातात, तेव्हा सर्वप्रथम 18001201740 वर तक्रार नोंदवा. त्यानंतर संबंधित बँकेत जाऊन फॉर्म भरून त्याची माहिती द्या. तुम्हाला त्यांना कॉल करून व्यवहाराची सर्व माहिती द्यावी लागेल. त्या बदल्यात, बँक तुम्हाला विनंती किंवा तक्रार क्रमांक देईल. बँकेने मदत करण्यास नकार दिल्यास, bankingombudsman.rbi.org.in येथे तक्रार करा. तुम्ही बँकेच्या ग्राहक सेवा विभागाला ईमेल पाठवून चुकीच्या हस्तांतरणाची माहिती देखील देऊ शकता. UPI आणि नेट बँकिंग द्वारे पेमेंट केल्यानंतर फोनवर आलेला मेसेज नेहमी जपून ठेवा. या मेसेज मध्ये ट्रांजेक्शन  क्रमांक असतो. जो तक्रारीच्या वेळी आवश्यक आहे.

तुम्हाला वापरलेल्या 2023 मध्य लेखी कागदपत्रे उपलब्ध असतील. UPI आणि आहेत (उ नेहमी हटवू नका. या संदेशात PPBL क्रमांक आहे, जो बँकेच्या शाखेशी संपर्क साधा दुसरा मार्गही आहे. तुम्ही बँकेच्या गृह शाखेला भेट देऊन व्यवस्थापकाशी बोलू शकता आणि चुकीच्या हस्तांतरणाची अधिकृत सूचना सबमिट करू शकता.

पैसे परत मिळतील

दिलेला खाते क्रमांक चुकीचा असल्यास किंवा अस्तित्वात नसल्यास, पैसे लगेच तुमच्या खात्यात जमा केले जातील. तपशील वैध असल्यास आणि पैसे गेले असल्यास, ते परत मिळवणे पूर्णपणे प्राप्तकर्त्यावर अवलंबून असेल. ज्या अकाउंट मध्ये चुकून पैसे जमा झाले आहेत त्या खातेदाराने पैसे परत करण्यास मान्यता दिल्यास ते पैसे कोणत्याही त्रासाशिवाय लगेच परत मिळतील.

युपीए पेमेंट संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास पुढील लिंकच्या साह्याने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तक्रार करू शकता. 

https://www.npci.org.in/what-we-do/upi/dispute-redressal-mechanism

🖕 Click Here